विस्कटलेला समाज सदृढ करण्याचा रघुराम राजन यांचा विचार
रघूराम राजन यांचं थ्री पिलर्स हे पुस्तक म्हणजे राज्यशास्त्र, अर्थ शास्त्र या विषयांची एक सहल आहे. राज्य (स्टेट), बाजार आणि समुदाय या समाजाच्या तीन घटकांचा इतिहास, त्यांची आजची स्थिती यांचा एक दीर्घ आढावा राजन यांनी घेतला आहे. बाजार,तंत्रज्ञान याचा संबंध राज्याशी येतो आणि हे दोन घटक मिळून समुदाय, समाज घडवतात. गेल्या वीसेक वर्षात तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण यामुळं खूप बदल घडले असून त्यामुळं समुदाय हा घटक मोडकळीला आला, विस्कटला आहे. तेव्हां समुदाय (community)सुदृढ व्हावा यासाठी काय करता येईल याचा विचार राजन…