ऑस्कर. ‘मिनारी’, आजी आणि नातवाचं खट्याळ गूळपीठ.
आजी आणि नातवाचं ‘ मिनारी ‘ हे खट्याळ गूळपीठ चुकवू नका. म्हटलं तर ही गोष्ट एका अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या कोरियन कुटुंबाच्या जगण्याच्या धडपडीची आहे. म्हटलं तर ही गोष्ट छोटा डेविड आणि त्याची आज्जी सून-जा यांच्यातल्या खोडकर गूळपिठीची गोष्ट आहे. कॅलिफोर्नियातल्या एका निर्मनुष्य माळावर जेकब पोचलाय. कोणीही माणूस आसमंतात नाही. जमिनीचा मोकळा तुकडा जंगलझाडांनी घेरलेला आहे. एका ट्रेलर घरात संसार थाटलाय. डॉक्टर म्हणा, एकादी वस्तू म्हणा, काहीही हवं असेल तर काही मैल दूर जावं लागतं. जेकबची बायको मोनिका म्हणते- कुठं निर्जन…