नसिरुद्दीनको गुस्सा क्यों आता है
नसिरुद्दीन शहा प्रॅक्टिसिंग मुस्लीम नाहीत. ते मशिदीत जात नाहीत, मुस्लीम माणसं जे धार्मिक विधी वगैरे करतात ते ते करत नाहीत. त्यांना भौतिक जगात काही अडलं तर त्या बाबत ते देवाचा, प्रेषितांचा, देव आणि प्रेषित यांच्या वतीनं सांगितलेल्या गोष्टीचा सल्ला किंवा मार्गदर्शन ते घेत नाहीत. भारतीय राज्यघटना, कायदा आणि स्वतःची विवेकबुद्धी यांच्या आधारे ते जगतात. त्यांच्या हातून जे काही घडतं, ते जे काही करतात ते स्वतःच्या जबाबदारीवर करतात. घातक किंवा उपकारक असं काहीही त्यांच्या हातून घडलं तर ते त्यासाठी स्वतःला जबाबदार…