पुरीतलं पाणी आणि गंगेतलं पाणी
वडोदरा (बडोदा नव्हे) नगरपालिकेनं पाणी पुरीवर बंदी घातलीय. शहरात नाना रोगांचा उच्छाद झाल्यावर पालिका अधिकाऱ्यांनी शहराचं आरोग्य कुठं बिनसतंय ते पहाण्यासाठी चौकशा केल्या, त्यात पाणी पुरीच्या गाड्यांवर त्यांना अस्वच्छता दिसली. पाणी पुरी मुंबईत असते, गोलगप्पा लखनऊमधे असतो, पुचका बंगालात असतो. कुठंही असो, पाणी पुरीचं पाणी शुद्ध नसतं. ती देणारा माणूस अस्वच्छ असतो, घामेजलेला असतो. ज्या हातानं घाम पुसतो तोच हात पाण्यात घालून ते पाणी पुरीत भरून खाणाऱ्याला देतो. या पाण्याबद्दल न ऐकलेल्या बऱ्या अशा अनंत कहाण्या आहेत. या कहाण्या माहित…