शिरीष दाते भारतात? शक्य नाही.
“ गेल्या साडेतीन वर्षात तुम्ही अमेरिकेन जनतेसमोर खोटं बोललात त्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो कां?” एका पत्रकारानं विचारलं. व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत सामान्यपणे समर्थक पत्रकार सुखकारक प्रश्न विचारतात याची सवय असलेले प्रे. डोनल्ड ट्रंप गोंधळले. त्यांनी विचारलं “ कशा बद्दल?” “ खोटं बोललात, जी जी बेईमानी (डिसॉनेस्टी) केलीत त्या बद्दल” पत्रकार म्हणाला. “ कोणी ते केलं?” ट्रंपनी विचारलं. “ तुम्ही.” पत्रकार म्हणाला. प्रश्न विचारणारा माणूस कोण आहे ते ढुंढाळण्याच्या प्रयत्नात ट्रंप होते. या पूर्वी अनेक वेळा त्यांनी या पत्रकाराला प्रश्न विचारू…