काळ्यांना अमेरिकेत क्रूरपणे वागवलं जातं. म्हणजे नेमकं काय होतं?
काळ्यांना अमेरिकेत क्रूरपणे वागवलं जातं. म्हणजे नेमकं काय होतं? जून २०१०. काळ्या माणसांना अमेरिकेत दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल असंतोष व्यक्त करणारं आंदोलन साऱ्या जगात उफाळून आलं. अमेरिकेत सुमारे २४ कोटी गोरे आहेत, २०१५ ते २०२० या काळात पोलिसांकडून मेलेल्या गोऱ्यांची संख्या आहे २३८५. अमेरिकेत ४ कोटी काळे आहेत, पोलिसांकडून मेलेल्यांची संख्या त्याच काळात १२५२ आहे. दर दहा लाखात १२ गोरे मारले जातात आणि दर दहा लाखात ३० काळे मारले जातात. ।। कलीफ ब्राऊडर, वय वर्षे १६, ब्राँक्समधे रहाणारा. काळा, अनाथ, …