करोना थकून मरावा, माणसं जिवंत रहावीत.
करोना संकटामुळं बेकार आणि धनहीन झालेल्या कोट्यावधी नागरिकांना जगवण्यासाठी भारत सरकार जनधन योजनेतहत दर नागरिकाच्या खात्यावर ५०० रुपये थेट पोचवणार आहे. महाराष्ट्रात सुमारे ८० लाख आदिवासी आहेत. लॉक डाऊन झाला तेव्हां ते आपल्या पाड्यापासून पाच पन्नास मैल अंतरावर कामासाठी गेले होते. कामं बंद झाली, घरी परतण्यावाचून गत्यंतर नाही, एसटी नाही, रेलवे नाही, ही माणसं पायी पायी आपापल्या घरी पोचली. या ८० लाख लोकांपैकी किती लोकांकडं आधार कार्ड आहे, किती लोकांकडं रेशन कार्ड आहे, किती लोकांचं जनधन खातं आहे याचा आकडा…