Browsed by
Author: niludamle

आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही गोष्टी साधणारा चित्रपट, पोस्ट.

आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही गोष्टी साधणारा चित्रपट, पोस्ट.

वॉशिंग्टन पोस्ट, प्रकाशक कॅथरीन ग्रॅहॅम, संपादक बेन ब्रॅडले. पेंटॅगॉन पेपर्स, वॉशिंग्टन पोस्ट, पत्रकारीचा इतिहास. वियेतनाममधे अमेरिकनं शस्त्रं, सैनिक, खूप निःशस्त्र आणि निरपराध माणसं मारली. वियेतनामीनी चिकाटीनं अमेरिकन संकटाला तोंड दिलं, अमेरिका पराभूत झाली. हे ढळढळीत सत्य अमेरिकन सरकार अमेरिकन जनतेपासून लपवत होतं. वॉशिंग्टन पोस्टचे व्यवस्थापकीय संपादक बेन ब्रॅडलेनी रँड कॉर्पोरेशनकडं गोळा झालेली माहिती मिळवली, माहितीवर आधारीत लेखमाला पेंटॅगॉन पेपर्स या शीर्षकानं सुरु केली. पोस्टवर दबाव आला. सरकारनं बंदी घातली. पोस्टची लायसेन्सेस रद्द केली, पोस्ट हा देशद्रोह करत आहे असं म्हणत…

Read More Read More

खेड्याचा विकास, धोरणाचा अभाव

खेड्याचा विकास, धोरणाचा अभाव

विकास यादीत १८१ देशात भारताचा क्रमांक १३१ वा लागतो. भारतातल्या  ४० टक्के मुलांची वाढ खुंटलेली असते, त्यांचं वजन कमी असतं. भारतात ५० टक्के स्त्रियांच्या रक्तात लोहाचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा खूप कमी असतं. माणसांना किती पौष्टिक आहार मिळतो या कसोटीवर भारत बांगला देश, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्याही मागं आहे. बहुसंख्य मुलांची वाचन क्षमता कमी आहे, पाचवीतल्या मुलाची वाचनक्षमता दुसरीत अपेक्षा असते त्या पेक्षा कमी असते. आवश्यक तेवढी हॉस्पिटल्स, दवाखाने, डॉक्टर्स, नर्सेस नाहीत. बहुसंख्य गावांत वीज नाही, जिथं वीज पोचली आहे तिथंही ती चोविस…

Read More Read More

बिटकॉईन. लोकांनी स्वीकारलेला भ्रम.

बिटकॉईन. लोकांनी स्वीकारलेला भ्रम.

बिट कॉईन. खासदार कणीमोळी यांनी संसदेत प्रश्न विचारला ” बिटकॉईन हे चलन नियंत्रित करायचा विचार सरकार करत आहे काय.”  अर्थमंत्री जेटली यांनी उत्तरात सांगितलं की त्यावर एका कमीटीद्वारे सरकारचा विचार सुरू आहे परंतू सरकार बिट कॉईन हे अधिकृत चलन मानत नाही. बिटकॉईन ऊर्फ आभासी नाणं ही एका अत्यंत डोकेबाज, कंप्यूटरी डोकं असणाऱ्या माणसाची निर्मिती आहे. सातोशी नाकोमोटो या माणसानं ते निर्मिलं.तो माणूस कोण आहे ते कोणालाच माहित नाही, कोणीही त्याला भेटलेलं नाही. काय आहे हे आभासी नाणं? नाकोमोटोनं एक अत्यंत…

Read More Read More

पुस्तकाची एकेक प्रत ३६ लाख डॉलर

पुस्तकाची एकेक प्रत ३६ लाख डॉलर

सॉदेबीज (sothebey’s) ही कंपनी मौल्यवान वस्तू गोळा करून त्यांचा लिलाव करते. कंपनीची माणसं जगभर फिरून कुठं कोणत्या वस्तू उपलब्ध आहेत, कोण काय विकायला तयार आहे, कोणती मौल्यवान वस्तू कुणाकडून मिळवायची याचा हिशोब ही कंपनी करते. व्यवसाय आहे. घेतलेल्या किमतीच्या जास्तीत जास्त पटीत लिलावाची बोली लागली पाहिजे.  वस्तूची बाजारात कोणती किमत येईल त्याचा योग्य अंदाज घेणं हे कसब असतं. चांगली किमत येईपर्यंत वस्तू थोपवून ठेवाव्या लागतात. मौल्यवान वस्तूत पुस्तकंही येतात. डेवनशायरच्या डचेस, डेबोरा यांच्याकडल्या वस्तू सोदेबीजनं मिळवल्या. त्यात पुस्तकंही होती. एक…

Read More Read More

बलात्कार, एक मामुली गोष्ट

बलात्कार, एक मामुली गोष्ट

अरे तू बलात्कार केलायस. उंह: त्यात काय मोठंसं. अरे ती जखमी झालीय. औषधोपचार करा. हवं तर मी पैसे देतो. अरे ती मेलीय. जा, तिच्या नातेवाईकांना भरपाई द्या. अरे पण तिला त्रास देण्याचा अधिकार तुला कोणी दिला. अधिकाराचा काय प्रश्न. माझी गरज होती, मी भागवली. १४ डिसेंबर २०१७.गाव, बोको. जिल्हा कामरुप, आसाम. आई वडील गावाजवळच्या वीट भट्टीवर कामाला गेले होते. १४ वर्षाची मुलगी घरी होती. काही जण (नेमके किती?) घरी पोचले. मुलीला पकडून गावात अन्यत्र नेलं. सर्वांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला.इतका…

Read More Read More

पास्ता आणि रसगुल्ला

पास्ता आणि रसगुल्ला

इटालीतल्या पार्मा या शहरात पास्ता तयार करण्याची स्पर्धा भरली होती. स्पर्धेचं शीर्षक होतं ‘ पास्ताचं भविष्य ‘. भविष्यात पास्ता कसा असेल.बरिला या पास्ता तयार करणाऱ्या कंपनीनं स्पर्धा स्पॉन्सर केली होती. पास्ता हा इटालियन लोकांच्या अभिमानाचा आणि अस्मितेचा विषय. खरा पास्ता फक्त आम्हीच तयार करू शकतो असं इटालियन लोकांना वाटतं. इटालियन पदार्थ वैश्विक करण्याची खटपट बरिला करत असते. जास्तीत जास्त आपला पास्ता जगभरात खपवणं हा कंपनीचा फंडा. जगभरातले फार म्हणजे फार लोकप्रीय आचारी (शेफ) स्पर्धेसाठी पार्मात गोळा झाले होते. टोकियो, लंडन,…

Read More Read More

‘ फादर ‘ बाप, नसीरुद्दीन शहा

‘ फादर ‘ बाप, नसीरुद्दीन शहा

  पृथ्वी थेटर पावणे नऊ झाले होते. माणसं दरवाजाबाहेर रांग करून उभी होती. शांतपणे. हातात फादर या नाटकाचं ब्रोशर. दहाएक मिनिटांनी दरवाजा उघडणार होता. गोंगाट नव्हता, माणसं आपसात किंवा सेलफोनशी कुजबुजत होती, ओठ हालत होते, ध्वनी उमटत नव्हता. दरवाजा उघडला. माणसं अलगतपणे थेटरात पोचली. रंगमचाच्या जमिनीवर रूंद पांढऱ्या  चिकटपट्ट्यांनी खोल्यांच्या भिंतींची जागा आखली होती. तीन खोल्या. एक किचन. एक लिविंग रूम आणि एक अशीच खोली. पाच ते सहाच फर्निचर वस्तू मंचावर. मंद प्रकाश. मंचाच्या तीन बाजूंनी बसायची सोय. ट्रेनमधे पूर्वी…

Read More Read More

सोशल मीडियानं लोकशाहीचा ताबा घेतलाय?

सोशल मीडियानं लोकशाहीचा ताबा घेतलाय?

लोकशाहीचा ताबा  सोशल मिडियानं घेतल्यासारखं दिसतय. अमेरिका,जर्मनी, फ्रान्स, युके, स्पेन  हे देश त्यांच्या सार्वजनिक जीवनात  सोशल मिडियानं घातलेल्या गोधळानं चिंतीत झालेत. २०१६ ची अमेरिकेची  अध्यक्षीय निवडणुक. प्रचार मोहिमेत भाषणं करकरून, तर कधी सर्दीमुळं हिलरी क्लिंटनचा घसा बसला होता. त्या खोकत होत्या. कधी काळी कुठल्या तरी कारणासाठी क्लिंटन तपासणीसाठी डॉक्टरांकडं गेल्या होत्या. डॉक्टरकडं जाणं आणि खोकल्याची दृश्यं या दोन एकमेकांशी संबंध नसलेल्या घटना एकत्र जोडून क्लिंटन  गंभीर आजारी आहेत, त्यांना मत देणं धोक्याचं आहे असा संदेश सोशल मिडियात ट्रंप मोहिमेनं पसरवला….

Read More Read More

एका राजपुत्राचं लग्न

एका राजपुत्राचं लग्न

राजपुत्र हॅरीचा क्रमांक आहे पाच. जेव्हां केव्हां सिंहासन मोकळं होईल तेव्हां आधी राजपुत्र चार्ल्सचा (हॅरीचा पिता) क्रमांक पहिला. कारण ते राणीचे सर्वात मोठे पुत्र. त्यांच्यानंतर त्यांचे मोठे पुत्र विल्यम्स (हॅरीचा मोठा भाऊ) यांचा नंबर. त्यानंतर विल्यम्स यांच्या मुलाचा (हॅरीचा पुतण्या) नंबर. विल्यम्सना एक मुलगीही (हॅरीची पुतणी) आहे. तिचाही राणी म्हणून नंबर लागू शकतो, पण आधी क्रमांक तिच्या भावाचा कारण ब्रिटीश परंपरेनुसार आधी अधिकार पुरुषाचा व नंतर स्त्रीचा.त्यानंतर पाचवा क्रमांक आहे राजपुत्र हॅरी याचा. विल्यम्स यांची पत्नी सध्या गरोदर आहे, बाळंत…

Read More Read More

दशक्रिया. अधिक चांगला चित्रपट होऊ शकला असता.

दशक्रिया. अधिक चांगला चित्रपट होऊ शकला असता.

दशक्रिया हा एक चांगला चित्रपट होऊ शकला असता. चित्रपटात क्रियाकर्म करणाऱ्या दोन ब्राह्मणांमधली स्पर्धा असं एक कथानक आहे.  क्रियाकर्म करणारे ब्राह्मण मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळतात असं आणखी एक कथानक आहे. कर्मकांडं, कर्मकांडांचा फोलपणा, अन्याय,त्याचं धर्माशी असलेलं नातं हे तिसरं कथानक. भान्या नामक एक खटाटोपी मुलगा हे चौथं कथानक. नाना धंदे करून हा मुलगा पैसे कमवतो, तो वात्रट असतो, तो त्याच्या वागण्यानं वरील चारही तीन्ही उपकथानकांमधल्या दोषांवर बोट ठेवतो. दिग्दर्शकाला चार अत्यंत नाट्यमय घटक एकत्र आणून त्यातून एक सलग जैविक कथानक…

Read More Read More