डळमळीत लोकशाही- तांझानिया
तांझानियातली डळमळीत लोकशाही तांझानियाच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. उद्याच्या डिसेंबरमधे स्थानिक संस्थांच्या निवडणुका होतील आणि पुढल्या वर्षी ऑक्टोबरमधे लोकसभेच्या निवडणुका होतील. तांझानियाच्या दारे सलाम या राजधानीच्या गावातली नुकतीच घडलेला घटना. तांझानियाच्या चाडेमा या विरोधी पक्षाचे सेक्रेटरी अली महंमद किबाव घरी परतत असताना बसमधून त्यांना काही लोकांनी उतरवलं. त्यांचे हात बांधले. घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेत सापडलं. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या, त्याच्या चेहऱ्यावर ॲसिडच्या खुणा होत्या. गेले काही दिवस विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अपहरणाच्या घटना घडत आहेत. तांझानियाला हडेलहप्पी आणि…