इराण युद्ध स्थगिती, एक नाटक?
डोनल्ड ट्रंप यांनी इराणी सिविलायझेशन नष्ट करण्याचा कार्यक्रम दोन आठवड्यासाठी स्थगित केला आहे. जगानं सध्या तरी हुश्श केलं आहे. ७ एप्रिलच्या सकाळी आठ वाजता ट्रंप यांनी इराणला अंतिम इशारा दिला होता. २४ तासाची मुदत देतो, होरमुझ सामुद्रधुनी मोकळी करा, नाही मान्य केलंत तर चोविस तासात इराण नष्ट करेन, इराण पुन्हा अश्मयुगात जाईल. पाठोपाठ तिकडं इस्लामाबादमधे प्रधान मंत्री शहाबाज खान त्यांचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या सोबत चर्चा करू लागले. २८ फेब्रुवारीला अमेरिकेनं इराणवर हल्ला सुरु केला त्यानंतर खान यानी…