देश उंदराचा पुतळा उभारतो
कंबोडियानं मागावा नावाच्या उंदराचा एक पुतळा आंगकोर वाट या स्थळी उभारलाय. आफ्रिकेतून हा उंदीर कांबोडियानं आयात केला होता. मागावा ७० सेंमी लांबी-उंचीचा होता. पुतळा २.२ मीटर उंचीचा आहे. आंगकोर वाट हा एक मंदिरांचा काँप्लेक्स आहे, तिथं अनेक मंदिरं आहेत. ११ व्या शतकात विष्णू या देवाची आठवण म्हणून तत्कालीन राजा सूर्यवर्मन या राजानं आंगकोर वाट उभारलं. नंतर त्याचं रुपांतर बुद्ध मंदिरांमधे झालं. आंगकोर वाटमधल्या १००० मंदिरांमधे हा उंदीर पुतळा असेल. विष्णू,बुद्ध, उंदीर. उंदराचा पुतळा कां? मागावानं १०० भूसुरूंग शोधले. मागावा…