ट्रंपची देश खरेदी
देश खरेदी विक्रीला काढलेत डोनल्ड ट्रंप यांनी ग्रीनलँडचा कबजा करायचं फारच मनावर घेतलेलं दिसतंय. काही काळ ग्रीनलॅंडची मागणी ही ट्रंप यांची एक लहर असेल असं वाटत होतं. ती तशी लहर दिसत नाहीये. ग्रीन लँड हा एक स्वायत्त देश आहे. डेन्मार्क या देशाचं संरक्षण ग्रीन लँडनं घेतलेलं असलं तरी तो डेन्मार्कचा भाग नाही. ग्रीनलँडची लोकसंख्या जेमतेम ५७ हजारांची आहे. ग्रीनलँडमधे भरपूर खनीजं आहेत, ती खनीजं दुर्मिळ आहेत आणि त्यांना उद्योगात खूप महत्व आहे. त्यासाठी ट्रंपना तो देश ताब्यात हवाय. रशियाचा आणि चीनचा…