शुभमंगल, बरेलीकी बर्फी.. चित्रपट सृष्टीतली नवी वळणं
माझ्या मागल्या रांगेत दोघी जणी शुभमंगल सावधान हा सिनेमा मराठीत आहे असं समजून आल्या होत्या. सिनेमा हिंदीत सुरु झाल्यावर ” शी: हे काय ” म्हणाल्या. पण काही वेळातच सिनेमाला सरावल्या, खिंदळू लागल्या. मुदीत सुगंधाच्या प्रेमात पडतो. रीतसर लग्न ठरतं. सुगंधाला सरळपणे लग्न नको असतं, काही तरी थरार असावा असं वाटत असतं. लग्नापूर्वी सेक्सचा अनुभव घ्यावा असं दोघं ठरवतात. मुदीत कंडोम आणतो. सभोवतालचं वातावरण, आपण करतोय ते ठीक आहे की नाही याची धास्ती. त्याचं लिंग उभं रहात नाही. इथून घोटाळा सुरु…