ट्रंप यांचा ट्वीटखेळ
आठ सप्टेंबरच्या पहाटे सव्वाचार वाजता प्रेसिडेंट ट्रंपनी ट्वीट करून जाहीर केलं की आपण कँप डेविड (अमेरिका) येथे होणारी तालिबान पुढाऱ्यांबरोबरची बैठक रद्द केलीय. ट्रंपनी म्हणे तालिबानच्या पुढाऱ्यांना कँप डेविडमधे बोलावून घेतलं होतं. ट्रंप यांचं ट्वीट प्रसारित झालं तेव्हां अमेरिका झोपेत होती, व्हाईट हाऊस, पेंटॅगॉन, सुरक्षा सल्लागार, सीआयएचे लोक इत्यादी सगळी जनता झोपेत होती. जाग आल्यावर त्यांना कळलं की ट्रंप तालिबानच्या पुढाऱ्यांबरोबर एक बैठक करणार होते. अमेरिकन सरकार, अमेरिकन लष्कर, अमेरिकन परदेश खातं अशा सगळ्याच ठिकाणची माणसं ट्रंप यांच्या ट्वीटनं बुचकळ्यात…