कापुस्किनस्की यांचं नवं पुस्तक
रिसर्ड कापुस्किनस्की हे एक पोलिश पत्रकार लेखक होते. १९५६ ते १९८१ या काळात कापुश्चिन्सकी आफ्रिका आणि आशियातल्या २७ देशात फिरले, तिथल्या राजकीय उलथापालथीच्या बातम्या त्यांनी प्रसिद्ध केल्या. त्यासाठी त्यांना ४० वेळा तुरुंगवास पत्करावा लागला, चार वेळा त्यांना फाशी सुनावली गेली, जिवावर बेतल्याच्या घटनांची तर मोजदादच नाही. पत्रकारी आणि साहित्य यांच्या सीमेवरचं त्यांचं लिखाण त्यांच्या गोष्टीरूप शैलीसाठी प्रसिद्ध आहे. मुळात त्यांचं लिखाण पोलिश भाषेत होतं. १९७८ साली अनदर डे ऑफ लाईफ हे अंगोलातल्या युद्धावरचं त्यांचं इंग्रजीत भाषांतर झालेलं पहिलं पुस्तक होतं….