पत्रकार असाही असतो
उंदीर हा एकाद्या दीर्घ लेखाचा विषय होऊ शकतो? जोसेफ मिचेल नावाचा पत्रकार ते करू शकतो. मिचेलनं १९४४ साली न्यू यॉर्कर या प्रसिद्ध साप्ताहिकात किनाऱ्यावरचे ( न्यू यॉर्कच्या किनाऱ्यावरचे) उंदीर या विषयावर १८ हजार शब्दांचा लेख लिहिला. १९३८ ते १९६४ म्हणजे २८ वर्षं मिचेलनं न्यू यॉर्क शहर याच विषयावर लेखन केलं. न्यू यॉर्कभर उंदीर पसरलेत. ते कुठं नाहीत असं नाही. कचरापट्टी, पडीक इमारती, धान्य आणि मांसाची मंडी यात तर ते सापडणारच पण न्यू यॉर्कमधल्या चांगल्या हॉटेलांतही असतात. ते भुयारं खणून रहातात….