Browsed by
Author: niludamle

अमेरिकेचं आधुनिक वळण दाखवणारी दोन पुस्तकं

अमेरिकेचं आधुनिक वळण दाखवणारी दोन पुस्तकं

अमेरिकेचं आधुनिक वळण दाखवणारी दोन पुस्तकं ०० THE ACCIDENTAL LIFE  .TERRY McDONELL . From Conunterculture to Cyberculture. Fred Turner || १९६० ते १९८० हा वीसेक वर्षाचा काळ अमेरिकन आधुनिक इतिहासाला नवं वळण देतो. या काळात समाजात निर्णायक उलथापालथ झाली. समाजाची आर्थिक, राजकीय आणि तंत्रवैज्ञानिक घडी समांतर वाटेनं जाणाऱ्या तरूणानी विस्कटली. टेरी मॅक्डोनेल यांच्या आठवणी आणि फ्रेड टर्नर यांचा समांतर चळवळीचा आढावा ही दोन पुस्तकं या काळात काय घडलं ते दाखवतात. लेखक गोळा करणं, त्यांना लिहितं करणं हाही संपादनाचा एक पैलू आहे. हा पैलू…

Read More Read More

सुकमा. सैन्य, सीआरपीफ यंत्रणा दहशतवादाशी लढण्यास योग्य नाहीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी.

सुकमा. सैन्य, सीआरपीफ यंत्रणा दहशतवादाशी लढण्यास योग्य नाहीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी.

दहशतवादाचा न संपणारा छळवाद छत्तीसगड राज्यात सुकमा गावात माओवादींनी केलेल्या गनिमी हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान मारले गेले. सीआरपीएफचे जवान दुपारी एकत्र जेवत होते.  अशा रीतीनं इतक्या जवानांनी एकत्र असणं रणनीतीमधे बसत नाही. सुमारे ३०० माओवाद्यांनी हल्ला केला. आदिवासींना पुढं ठेवून हल्ला करण्यात आला. अचानकपण, माओवादी कोण आणि निष्पाप आदिवासी कोण ते न कळणं, निष्पापांची ढाल या तीन घटकांमुळं सीआरपीला प्रतिकार करण्यात अडचणी आल्या. छत्तीसगडमधे सीआरपीएफ आणि सीमा सुरक्षा दलाचे १५ हजारपेक्षा जास्त सैनिक माओवाद्यांचा सामना करत आहेत. छत्तीसगड राज्याचे पोलिस…

Read More Read More

शेतकरी कर्जमाफी ही पहिली पायरी. दूरगामी अर्थरचना बदल आवश्यक.

शेतकरी कर्जमाफी ही पहिली पायरी. दूरगामी अर्थरचना बदल आवश्यक.

शेतकरी आत्महत्या थांबत नाहीयेत. कर्जं माफ करा अशी काँग्रेस व इतर पक्षांची मागणी आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की कर्ज माफ करून शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत, फडणवीस कर्जमाफीला तयार नाहीत. ते विरोधकांना विचारतात, मी कर्जंमाफी करतो, तुम्ही शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी घ्याल काय. उत्तर प्रदेशात शेतकरी आत्महत्या कमी आहेत तरीही तिथल्या भाजप मुख्यमंत्र्यांनी तीसेक हजार कोटींचं कर्ज माफ केलंय. फडणवीस कर्ज माफीला तयार नाहीत कारण  कर्ज माफ करायचं म्हणजे त्या कर्जाची भरपाई करावी लागेल,ते कर्ज देणाऱ्या बँकांना तेवढे पैसे…

Read More Read More

अनारकली ऑफ आरा

अनारकली ऑफ आरा

स्त्रियांचा मान राखा असं सांगणाऱ्या सिनेमांमधे अनारकली ऑफ आरा या सिनेमानं एक दणदणीत भर घातलीय. अनारकली ही एक गात गात नाचणारी किंवा नाचता नाचता गाणारी कलाकार आहे. ती भोजपूर जिल्ह्यात आरा या गावात रहाते. आसपासच्या गावांत ती कार्यक्रम करते. कधी लग्न प्रसंग, कधी संमेलन, कधी कोणाची तरी हौस. श्रोते असतात बिहारी. खेडवळ असतात. महानगरी संस्कृतीचे बटबटीस संस्कार त्यांनी स्वीकारलेले असतात. त्यांच्या दैनंदिन जगण्यात उसळी मारणाऱ्या आणि बंधनांचं अस्तित्वच नाकारणाऱ्या इच्छा, वासना भागवणारा परफॉर्मन्स अनारकली करत असते. भोजपूरमधल्या रसिकांची एक स्वतंत्र…

Read More Read More

वस्तुनिष्ठ, तपशीलवार, चौफेर, सखोल, विचार- घडवणारं सा.माणूस, घडवणारे माजगावकर.

वस्तुनिष्ठ, तपशीलवार, चौफेर, सखोल, विचार- घडवणारं सा.माणूस, घडवणारे माजगावकर.

वस्तुनिष्ठ, तपशीलवार, चौफेर, सखोल, विचार- घडवणारं सा.माणूस, घडवणारे माजगावकर. तीही एक गंमतच. परुळकर नावाचा पक्षी माजगावकरांच्या टेबलावर आपणहून आला. पक्षी टेबलावर येणं ही माणूस ‘ चे संपादक श्री.ग.माजगावकर यांची वाकलकब. ते म्हणत की लेख आणि लिहिणारी माणसं हे पक्षी त्यांच्या   टेबलावर आपणहून येऊन बसतात. विजय परुळकर हा पक्षी माजगावकरांच्या टेबलावर एके दिवशी आला. परुळकर हे  व्हिडियोग्राफर, परदेशात काम करत असत. ते देशात परतले. पुण्यात बानू कोयाजी यांच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमामधे ते फिल्म्स करत असत. ते ‘ माणूस ‘ वाचत असत….

Read More Read More

मंडेलांच्या सोबत २६ वर्षे तुरुंगावास भोगलेला संयमी लढवय्या

मंडेलांच्या सोबत २६ वर्षे तुरुंगावास भोगलेला संयमी लढवय्या

दक्षिण आफ्रिकेतले स्वातंत्र्य सैनिक अहमद कथ्राडा परवाच्या २८ मार्चला वयाच्या ८७ व्या वर्षी वारले. नेल्सन  मंडेला यांच्यासोबत ते २६ वर्षं तुरुंगात होते. द.आफ्रिकेमधे कथ्राडा यांना नेल्सन मंडेला यांच्या बरोबरीचं स्थान आहे. १९४८ साली नॅशनल पार्टीनं दक्षिण आफ्रिकेमधे वंशद्वेषाचं धोरण अवलंबलं, काळ्यांना स्वातंत्र्य आणि अधिकार नाकारणारे वर्णद्वेषी कायदे केले. सरकारच्या वंशद्वेषी धोरणाविरोधात नेल्सन मंडेला यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस स्थापन करून लढा सुरु केला. त्या लढ्यात अहमद कथ्राडा मंडेला यांच्यासोबत होते. एका अगदी साध्या तंबूमधे त्यांचं शव दफनापूर्वी ठेवण्यात आलं होतं. कोणताही…

Read More Read More

निवासी डॉक्टर बळीचा बकरा

निवासी डॉक्टर बळीचा बकरा

सरकारी इस्पितळात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांना एकापेक्षा अधिक वेळा रोग्यांच्या संबंधितांनी मारहाण केली. काही ठिकाणी छोट्या खाजगी रुग्णालयातल्या डॉक्टरांनाही मारहाण झाली. रोग्याला योग्य उपचार न मिळणं, वेळेवर उपचार न मिळणं, उपचाराचा उपयोग न होऊन रोगी दगावणं या कारणांवरून चिडलेल्या लोकांनी डॉक्टरांना मारहाण केली. निवासी डॉक्टरांनी संरक्षणाची मागणी केली. एकदा नव्हे तर अनेक वेळा. त्यांना संरक्षण मिळालं नाही. अऩेक ठिकाणी पोलिस किंवा रुग्णालयाचे रक्षक हजर होते पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. बरेच वेळा मारहाण करणाऱ्या लोकांची संख्या येवढी मोठी असते की…

Read More Read More

अवनती रोखणारा संपादक

अवनती रोखणारा संपादक

कालचा सामान्य दिवस आणि वैशिष्ट्यहीन माणूस आज  प्रशस्तीपात्र ठरू लागणं ही  काळ उतरणीवर लागल्याची खूण असते. तथापि अशा काळातही काही माणसं थांबेठोकपणे उभी रहातात, संस्था उभ्या करतात, उतरणीवरही माणसाला शिखराकडं चालायला प्रवृत्त करतात. त्या पैकी एक माणूस म्हणजे रॉबर्ट सिल्वर्स. न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्सचे संपादक. हा संपादक २० मार्च २०१७ रोजी वयाच्या ८७व्या वर्षी वारला. रॉबर्ट सिल्वर्स या संपादकानं १९६३ साली न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स हे पाक्षिक सुरु केलं, अवनती रोखून धरली. सिल्वर्स यांनी अमेरिकन संस्कृतीला एक नाममात्र…

Read More Read More

लिलिबिट या मुलीची राणी एलिझाबेथ होते

लिलिबिट या मुलीची राणी एलिझाबेथ होते

एक  मुलगी. साध्याशा फ्रॉकमधे खेळतांना, हिंडताना दिसते.  ती जिथं वावरते ते घर आणि परिसर हे एक मोठं प्रकरण आहे  हे सहज  लक्षात येतं. हळूहळू कळतं की तो  बकिंगहॅम राजवाडा आहे. ही मुलगी कोण? ही मुलगी  एका मोठ्या माणसाला म्हणजे तिच्या वडिलांना म्हणजे राजे जॉर्ज यांना शपथ देते. हा काय प्रकार? खूप वेळानं कळतं की जॉर्जचा मोठा भाऊ एडवर्ड हा खरा राजा असतो. पण त्याला एका घटस्फोटितेशी लग्न करायला राजवाडा परवानगी देत नसल्यानं त्याला सिंहासन सोडावं लागतं.  मनापासून तयार नसतांनाही जॉर्जला…

Read More Read More

अरब जगातलं क्रौर्य दाखवणारी रियाद सत्तुफची कॉमिक कादंबरी

अरब जगातलं क्रौर्य दाखवणारी रियाद सत्तुफची कॉमिक कादंबरी

सीरिया. होम्स या मोठ्या शहरापासून काही अंतरावरचं तेल माले नावाचं गाव.   रियाद सत्तुफ बापाचं बोट धरून बाजारातून घराकडं निघालेला असतो. वाटेत मुख्य चौक लागतो. बाप, अब्देल रझाक,  अचानक हातातली बादली रियादच्या डोक्यावर उलटी करतो. रियाद घुसमटतो. बाप रियादला जोरात फरफरटत ओढत घराकडं घेऊन जातो. घराच्या जवळ पोचल्यावर रियादच्या डोक्यावरची बादली काढतो. बापानं असं कां केलं ते रियादला कळत नाही. बापाचं लक्ष नाही असं पाहून रियाद पटकन मागं वळून पहातो. चौकात खांबांना प्रेतं लटकत असतात. हफेझ असाद या सिरियाच्या अध्यक्षाच्या आज्ञेवरून…

Read More Read More