सिनेमे. मिस्ट्रेस डिस्पेलर
मिस्ट्रेस डिस्पेलर. आधुनिक जगाचं एक लक्षण म्हणजे जोडप्यांतला बेबनाव. पती पत्नी एकमेकापासून तुटू लागण्याचं एक कारण असावं वेल्फेर स्टेट. साधारणपणे दुसऱ्या महायुद्धानंतर वेल्फेर स्टेट ही कल्पना साकार होत गेली. माणसं वाऱ्यावर सोडली जात नाहीत. माणसाच्या गरजा भागवण्यासाठी, संकटकाळात मदतीसाठी स्टेट (सरकार) सरसावलंय. ज्या गोष्टी कुटुंब आणि परिवार सांभाळत होत्या त्या गोष्टी आता स्टेट (सरकार)करू लागलंय. उदा. स्त्री. आता स्त्री शिकते, स्वतंत्रपणे पैसे मिळवते, पैसे मिळवणं ही आता पुरुषाची मक्तेदारी राहिलेली नाही. स्त्री एकटी हिंडू शकते. स्त्री एकटी कामाच्या ठिकाणी…