शक्तीशाली बाँब इराणमधे वापरून अमेरिकेनं काय मिळवलं?
आठवडाभर घोळ घातल्यावर अमेरिकेनं इराणवर प्रत्येकी ३० हजार पाऊंडापेक्षा जास्त वजनाचे बाँब टाकले. ट्रंप म्हणतात की इराणची अणुविकास व्यवस्था संपली आहे. इराणचं कधीही भरून निघणार नाही इतकं नुकसान झालं आहे. इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे हे खरंच आहे. इराणचा अणुकार्यक्रम दीर्घ काळ रखडेल. परंतू तो नष्ट झालेला नाही. तो ठिकठिकाणी आधीच विखुरलेला आहे, इराण तो पुन्हा दुरुस्त करून कामाला लावेल. इराण चिरडीला आहे. दुखावला आहे. आता तो शरण येण्याची शक्यता दुरावली आहे. उरल्या सुरल्या ताकदीचा वापर करून तो अमेरिकेचं, इस्रायलचं…