मीरा नायरचा मुलगा न्यू यॉर्कचा मेयर?
एक भारतीय माणूस न्यू यॉर्कच्या इतिहासात पहिल्यांदाच मेयर होऊ घातलाय.झोरान ममदानी असं त्याचं नाव आहे. मीरा नायर या फिल्म मेकरचा तो मुलगा. १९९८ साली झोरानचे आई वडील युगांडातून न्यू यॉर्कमधे स्थलांतरित झाले. त्या वेळी झोरान सहा वर्षाचा होता. २०१८ साली झोराननं अमेरिकेचं नागरीकत्व घेतलं. गेली तीन वर्ष झोरान न्यू यॉर्कच्या विधानसभेचा सदस्य आहे. झोराननं अमेरिकेचं लक्ष वेधून घेतलंय. डोनल्ड ट्रंप आणि नरेंद्र मोदी अशा दोघांवरही त्यानं टीका केली. दोघंही वंशद्वेष्टे आहेत असा त्याचा आरोप आहे. झोरान ट्रंपवर टीका करतो…