इस्रायल नव्हे, धंदा महत्वाचा
अमेरिका आणि इस्रायल यांच्यातली दोस्ती आता संपत चाललीय? अशी शंका यावी अशा घटना एकापाठोपाठ घडत आहेत. एक नव्हे अनेक घटना घडल्यामुळं त्यात एक पॅटर्न आहे, एक संगती आहे असं वाटतंय. ट्रंपनी इराणशी वाटाघाटी सुरु केल्या. इराणनं बाँबसाठी अणुविकास थांबवावा, अमेरिका इराणवरची आर्थिक बंधनं शिथील करेल,इराणच्या अणु कारखान्यावर हल्ला करणार नाही असं या कराराचं रूप असेल. या अटी जुन्याच आहेत. ओबामा, बायडन याच अटींवर वाटाघाटी करत होते. बदल्यात अमेरिकेनं इराणवरचे आर्थिक निर्बंध उठवावेत अशी इराणची मागणी. अमेरिकेच्या निर्बंधांमुळं इराणची अर्थव्यवस्था उतरतीला…