आधीच माकड, त्यात मद्य प्यालं…
डोनल्ड ट्रंप एकदा अध्यक्ष झाले. दुसऱ्यांना हरले. जो प्रेसिडेंट दुसऱ्या टर्ममधे निवडून येत नाही त्याचा उल्लेख अमेरिकन लोक वन टर्म प्रेसिडेंट असा हेटाळणीच्या सुरात करतात. पुन्हा ट्रंपनी निवडणुक लढवली, निवडून आले. अमेरिकेच्या इतिहासात असं घडलेलं नाही. पहिल्या निवडणुकीच्या काळात त्यांनी केलेल्या ३७ गुन्ह्यांबद्दल ट्रंपना शिक्षा झाली. प्रेसिडेंट गुन्हेगार सिद्ध होण्याची ही पहिली वेळ होती. ट्रंपचं म्हणणं की खटला राजकीय होता, आपण निर्दोष आहोत. २०२० च्या निवडणुकीत झालेला पराभव ट्रंपनी मान्य केला नाही. बायडनना अधिकृत अध्यक्ष म्हणून मान्य करण्याचा औपचारीक विधी…