सिनेमा. सोवियेत बस स्टॉप.
सोवियेत बस स्टॉप्स. माहितीपट. आपला अनुभव. गावाच्या बाहेर, हमरस्त्याच्या कडेला एक बस स्टॉप असतो. परगावी जाणारी बस तिथं थांबते. गावातून बऱ्याच अंतरावर माणसं स्टॉपवर येतात. काही काळ तिथं सामान घेऊन थांबायचं. बस आली की जायचं. एक छप्पर, आडोशासाठी भिंत, येवढं पुरेसं असतं, करायचीय काय त्यासाठी एकादी वास्तू. १९९० पूर्वीच्या सोवियेत युनियनची गोष्टच वेगळी आहे. तिथं बस स्टॉप म्हणजे एक कलात्मक वास्तू होती. विचारपूर्वक, मेहनतीनं केलेलं बांधकाम. एकाद्या गावात नव्हे तर गावोगाव. सोवियेत युनियनच्या पंधरा राज्यांत असे किती तरी कलात्मक…