राज कपूर. एक पूर्ण सिनेमापुरुष
राज कपूर वयाच्या तिसऱ्या वर्षी १९२७ साली मुंबईत आला. पृथ्वीराज कपूर हे त्याचे वडील. राज कपूरचं त्यावेळचं नाव होतं सृष्टीनाथ कपूर. पृथ्वीराज पेशावरहून मुंबईत आले होते कारण ते अर्देशीर इराणीच्या आलम आरा या भारतातल्या पहिल्या बोलपटात काम करणार होते. मुंबईत मुंबईत पोचल्यावर लगोलग वयाच्या पाचव्या वर्षी राज कपूरनं टॉय कार्ट या नाटकात काम केलं. त्यात त्याला बक्षीसही मिळालं. १९३५ मधे ‘इन्किलाब’ मधल्या अभिनयानं राज कपूरची चित्रपट कारकीर्द सुरु झाली. ❖ तो काळ कसा होता? १९३६ मधे व्ही शांताराम यांच्या …