असांज सुटला
अमेरिकन सरकार वृत्तपत्रांच्या गळ्यापासून एका इंचावर. ।। जुलियन असांज जवळपास १२ वर्षांच्या तुरुंगवासातून अखेर मुक्त झाला. सरकारांनी गुप्त ठेवलेली माहिती चोरून ती वर्तनामपत्रांना देणं हा आरोप असांजवर होता. २०१२ साली असांजनं अमेरिकन कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी लंडनमधल्या इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला. इक्वेडोरमधे राजकीय उलथापालथ झाल्यानंतर इक्वेडोरनं असांजला आश्रय नाकारला. असांज लंडनमधल्या तुरुंगात रवाना झाला. परवा त्याची सुटका झाली, तो आपल्या ऑस्ट्रेलियातल्या घरी परतला. असांज ऑस्ट्रेलियाचा नागरीक आहे. ।। हेरगिरी कायद्याचा भंग केल्याचा आरोप मान्य करून जुलियन असांजनं अमेरिकन सरकारला वृत्तपत्रांचा गळा…