युक्रेन युद्ध थांबण्याची लक्षणं नाहीत

युक्रेन युद्ध थांबण्याची लक्षणं नाहीत

 डोनल्ड  ट्रंप हा जत्रेतला आकाश पाळणा सध्या बराच खाली आलाय, युक्रेनच्या हिताकडं वळलाय.  झेलेन्सकी, युरोपीय नेते आणि ट्रंप यांची वॉशिंग्टनमधली भेट सौहार्दाची झाली असं दिसतंय.  सहा महिन्यांपूर्वी ट्रंप झेलेन्सकीना व्हाईट हाऊसमधे भेटले तेव्हां त्यांचं झेलेन्सकींबरोबरच वर्तन उद्धटपणाचं होतं. झेलेन्सकींनी पहेरलेल्या टी शर्टवर ट्रंप खडूसपणे बोलले होते की त्यांच्याकडं घालायला चांगले कपडेही नाहीत. काल वॉशिंग्टनमधे झेलेन्सकी भेटले तेव्हां ट्रंपनी झेलेन्सकींच्या कपड्यांचं कौतुक केलं. झेलेन्सकीनी ट्रंपची स्तुती टाळली पण  सर आणि थँक यू असं म्हणत होते. युक्रेन युद्धाबाबत शस्त्रसंधी झाली? एका वाक्यात…

Read More Read More

गडगडाट. पाऊस पडला नाही. ट्रंप पुतीन चर्चा.

गडगडाट. पाऊस पडला नाही. ट्रंप पुतीन चर्चा.

 गडगडाट झाला. विजा चमकल्या. पाऊस पडला नाही. युक्रेन-रशिया युद्ध थांबलं नाही. डोनल्ड ट्रंप व्लादिमिर पुतीन यानी ढोल बडवून गवगवा करून चर्चा केली.  युद्ध सुरूच राहिलं.  अलास्का या अमेरिकेतल्या राज्यात बैठक झाली. हे राज्य १८७८ साली रशियन राणीनं अमेरिकेला विकलं होतं.रशिया एका युद्धात पार बुडाला होता, रशियाकडं पैसे नव्हते. अलास्का विकून रशिया तगला होता. आठवडाभर ट्रंप संदेश देत होते. निघतांना व्हाईट हाऊसच्या विमानतळावर त्यांनी संदेश दिला. विमानात बसून संदेश दिला. विमान अलास्कात उतरल्यावर ट्रंप विमानाबाहेर आले आणि सदेश दिला. ‘मी युक्रेन-रशिया…

Read More Read More

गाझाचा कोंडवाडा

गाझाचा कोंडवाडा

 इस्रायलनं गाझा शहर पूर्णपणे ताब्यात घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शहराचा तीन चतुर्थांश भाग इस्रायलनं आधीच नष्ट केला आहे.  इस्रायल पॅलेस्टाईन नष्ट करत आहे. पॅलेस्टाईन हा  इस्रायलबरोबरच नांदणारा एक सार्वभौम देश निर्माण करावा असा युनोचा ठराव आहे;  १४० देशांनी पॅलेस्टाईन हे सार्वभौम राष्ट्र निर्माण करावं असं म्हटलेलं आहे. इस्रायल जगाला धुडकावत आहे. शहर ताब्यात घेऊन इस्रायलला पाच उद्दिष्टं साध्य करायची आहेत. हमास निःशस्त्र करणं, हमासनं पकडलले ओलीस सोडवणं, गाझा निर्लष्कर करणं, गाझावर इस्रायल सुरक्षित करणारी नियंत्रणं स्थापित करणं, गाझावर एक…

Read More Read More

ट्रंपशाही झिडकारणारा ब्राझीलचा अध्यक्ष

ट्रंपशाही झिडकारणारा ब्राझीलचा अध्यक्ष

 ब्राझीलचे अध्यक्ष दा सिल्वा आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रंप यांच्यात सध्या जाहीर झकाझकी चाललीय. ट्रंप दादागिरी करत आहेत आणि दा सिल्वा जाहीरपणे ट्रंपांना झिडकारत आहेत, ट्रंपांवर टीका करत आहेत. युरोपसह जगभरचे पुढारी ट्रंप यांना चुचकारत असताना दा सिल्वा सभ्य भाषेत ट्रंप यांच्या दादागिरीला नकार देत आहेत. ट्रंपनी ब्राझीलवर ५० टक्के जकात लादली.  जकात लादल्यावर ब्राझीलचे अध्यक्ष दा सिल्वा म्हणाले ‘ जकात आर्थिक कारणांसाठी लादलेली नाही, राजकीय कारणांसाठी लादलेली आहे. जकात लादल्याचे परिणाम आहेत. काही उत्पादनं ब्राझीलमधे महाग होतील, ब्राझिली जनतेला त्रास…

Read More Read More

पाच हजार रुपयांची पाण्याची बाटली

पाच हजार रुपयांची पाण्याची बाटली

घराबाहेर पडताना आपण पाण्याची एक बाटली जवळ बाळगतो. ती बाटली  आता एक दागिना झालाय.  युरोपात, अमेरिकेत या बाटल्या साठ डॉलरला (पाचेक हजार रुपये) विकल्या जातात.  बाटल्या आकर्षक रंगात असतात. बाटल्यांना टांगण्यासाठी की चेन मिळतात. बाटल्या हातात घेऊन हिंडता यावं यासाठी बाटलीला हुक असतात. बाटल्यांवर नामांकित माणसांची चित्रं असतात. मेस्सी या फूटबॉलपटूचं चित्र छापलेल्या  बाटल्या धडाधड संपत आहेत. कॉलेजात जाणाऱ्या प्रत्येकाच्या हातात एक आकर्षक बाटली लटकत असते.  रस्त्यावर, कामाच्या जागी, चित्रपटघरात, रेलवेत, विमानात, चराचर सृष्टीत सर्व ठिकाणी रंगीत आकर्षक बाटल्या दिसतात. …

Read More Read More

सीआयएचं गूढ उकलणारं पुस्तक

सीआयएचं गूढ उकलणारं पुस्तक

टिम वायनर यांचं The Mission: The CIA in the 21st Century हे पुस्तक दुकानांत आणि ॲमेझॉनवर आलंय. टिम वायनर हे पत्रकार आहेत. तीसेक वर्षं ते टाईम्सचे विदेश बातमीदार होते. त्या काळात अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, मेक्सिको आणि सुदानमधून त्यांनी टाईम्ससाठी वृत्तांत, बातम्या पाठवल्या.  लेखकानं एकविसाव्या शतकात सीआयए कसे निर्णय घेतं याचं तपशीलवार वर्णन प्रस्तुत पुस्तकात केलं आहे.  सीआयएनं माहिती गोळा करावी आणि त्यावर प्रेसिडेंटनं निर्णय घ्यावा असं अपेक्षित असतं. तसं धडतंच असं नाही.  सीआयएचं मुख्य काम आहे हेरगिरी. अमेरिकेच्या शत्रूंवर लक्ष…

Read More Read More

लकी भास्कर

लकी भास्कर

 ‘लकी भास्कर’  ही तेलुगू फिल्म नेटफ्लिक्सवर आलीय. ट्रेलरमधे लिहिलं होतं की ही फिल्म थ्रिलर आहे.बँक क्लार्कच्या श्रीमंत होण्याचं धाडस चित्रपटात आहे असंही लिहिलं होतं. हीरोचे  धोनीसारखे भरघोस केस, चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य. देखणा नाही पण आवडू शकेल असा माणूस. बँकेत काम करतो. मग त्यात थ्रिल कशा प्रकारचं असेल असा विचार मनात आला.भाग्यवान आणि थरार. उत्सूकता जागृत झाली.  एका साधा घरेलू माणूस, घर चालवण्यासाठी त्याला एक्स्ट्रा पैसे मिळवायचे असतात. बँकेचे पैसे तो वापरतो. बँकेचे पैसे घ्यायचे, स्मलगर लोकांना द्यायचे, वेळेवर पुन्हा…

Read More Read More

मीरा नायरचा मुलगा न्यू यॉर्कचा मेयर?

मीरा नायरचा मुलगा न्यू यॉर्कचा मेयर?

 एक भारतीय माणूस न्यू यॉर्कच्या इतिहासात पहिल्यांदाच मेयर होऊ घातलाय.झोरान ममदानी असं त्याचं नाव आहे. मीरा नायर या फिल्म मेकरचा तो मुलगा. १९९८ साली झोरानचे आई वडील युगांडातून न्यू यॉर्कमधे स्थलांतरित झाले. त्या वेळी झोरान सहा वर्षाचा होता. २०१८ साली झोराननं अमेरिकेचं नागरीकत्व घेतलं. गेली तीन वर्ष झोरान न्यू यॉर्कच्या विधानसभेचा सदस्य आहे. झोराननं अमेरिकेचं लक्ष वेधून घेतलंय. डोनल्ड ट्रंप आणि नरेंद्र मोदी अशा दोघांवरही त्यानं टीका केली. दोघंही वंशद्वेष्टे आहेत असा त्याचा आरोप आहे.   झोरान ट्रंपवर टीका करतो…

Read More Read More

१८६१ साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक

१८६१ साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक

 एक लेख लिहिण्याच्या निमित्तानं संदर्भासाठी पुस्तकं वाचत असताना वॉल्टर बॅजेट यांनी लिहिलेली एक पुस्तिका मिळाली. Memoirs of the Right Hon. James Wilson असं या पुस्तिकेचं नाव आहे. १८६१ साली ही ६७ पानी पुस्तिका प्रसिद्ध झाली. आता गुगल बुक्सनं ती पुस्तिका उपलब्घ केली आहे.   पुस्तकात जेम्स विल्सन यांच्या आठवणी आहेत. जेम्स विल्सन म्हणजे इकॉनॉमिस्ट या जगन्मान्य साप्ताहिकाचे संपादक. ते भारताचे पहिले अर्थमंत्री होते. १८५७ पूर्वी भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. १८५७ साली बंड झालं. बंडाला तोंड देता देता फार…

Read More Read More

ट्रंप ‘फ’वाली शिवी हासडतात तेव्हां..

ट्रंप ‘फ’वाली शिवी हासडतात तेव्हां..

ट्रंपनी कॅमेऱ्यासमोर ‘फ’वाली शिवी हासडली.  ट्रंप युरोपच्या दौऱ्यावर निघाले असताना विमानतळावर पत्रकारांनी त्यांना गाठलं. ‘२१ तारखेला इराणवर बाँब टाकल्यावर तुम्ही म्हणालात की इराण इसरायल  युद्ध थांबलंय. तसं झालेलं दिसत नाहीये. तुमची प्रतिक्रिया सांगा.’ ट्रंप सुटले. इसरायलला ‘फ’वाली शिवी हासडली. इराण आणि इसरायलना कळत नाहीये की ते काय करतातेत असं येशू ख्रिस्ताच्या स्टाईलनं बोलले,  विमानाच्या शिडीकडं रवाना झाले.  इराणनं अणुशस्त्राला आवश्यक दर्जाचं युरेनियम तयार करणं थांबवावं या विषयावर अमेरिका-  इराण चालल्या होत्या.  नेतान्याहूना वाटाघाटी नको होत्या, लढाई करायची होती. ट्रंपना डील…

Read More Read More