रविवार / पुतळे
आपल्याला प्रिन्स फिलिप माहित आहेत. दिवंगत राणी एलिझाबेथ यांचे पती. ते १९७७ ते २०११ येवढा काळ केंब्रिज युनिव्हर्सिटीचे चॅन्सेलर होते. त्यांचा पुतळा केंब्रिज शहराच्या मोक्याच्या जागी बसवायचं पालिकेनं ठरवलं. तसा ठराव झाला, उरुग्वेतले एक शिल्पकार पाब्लो एच्युगेरी यांना कंत्राट दिलं. १.५० लाख पाऊंड मेहेनताना देण्यात आला. २०१४ साली पुतळा केंब्रिजमधे पोचला तेव्हां केंब्रीज पालिकेच्या कला विभागाचा अधिकारी नाराज झाला. त्यानं नोंद केली की पुतळ्याचा दर्जा चांगला नाहीये, पुतळा लोकांसमोर येणं मला योग्य वाटत नाही. ब्रीटन म्हटलं की चर्चा आलीच. पालिकेत…