रविवार/ बोटीवर हौसमौज
अमेरिकेतल्या मायामीमधल्या एका बंदरातून एक बोट हौशी प्रवाशांना घेऊन निघालीय. या बोटीचं नाव आहे आयकॉन ऑफ सीज. समुद्र भूषण. ही बोट ३६५ मीटर लांबीची आहे. बोटीवर २० डेक्स म्हणजे मजले आहेत. सर्वात वरच्या डेकवर म्हणजे गच्चीवर वेगवान गाड्यांची शर्यत खेळता येते. बोटीवर फूटबॉल खेळता येतील अशी मैदानं आहेत, ६ स्विमिंग पूल आहेत, १७ मीटर उंचीचा एक धबधबाही केलेला आहे. उंचावरून पाण्यात उतरण्यासाठी केलेल्या ६ घसरगुंड्या आहेत, चित्रपटांसाठी आणि संगीत जलशांसाठी सिनेघरं आहेत, गोल्फ कोर्स आहे, ४० रेस्टॉरंट्स आणि बार आहेत….