रविवार/इसरायलनं पॅलेस्टाईन जवळजवळ संपवलंय.
।। गाझा जमीन दोस्त झालं. पुढे काय? ७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझामधले सुमारे १५०० हमासचे सैनिक इसरायलमधे घुसले.गाझामधून त्यांनी पाचेक हजार रॉकेटं इसरायलवर फेकली.इसरायलनं २००७ पासून गाझाची नाकेबंदी केली होती, गाझाभोवती कुंपण उभारलं होतं. हमासींनी कुंपण तोडलं. कार, मोटारसायकली घेऊन ते गाझाच्या हद्दीच्या नजीक असलेल्या किबुत्झमधे घुसले.किबुत्झचा हिब्रू भाषेतला अर्थ गट. स्वयंप्रेरणेनं संघटित झालेला गट. सकाळच्या प्रहरी झालेला हल्ला अनपेक्षीत होता. हमासींनी बेधुंद गोळीबार करत वाटेत जो दिसेल त्याला गोळ्या घातल्या. नंतर ते घराघरात घुसले. इसरायली घरात एक सुरक्षीत खोली…