रक्त तपासणीची अमेरिकन बनवाबनवी
अमेरिकेत एक जाम उदबोधक आणि रंजक नाटक घडतय. हे नाटक म्हणजे कोर्टनाटक आहे. एलिझाबेथ होम्स या महिलेवर लोकांना फसवल्याचा आरोप आहे, आरोप सिद्ध झाला तर होम्सना वीस वर्षाची शिक्षा आणि काही लाख डॉलर्सचा दंड होऊ शकेल. रक्ताच्या दोन थेंबात दोनशे तपासण्या करणारं यंत्रं आपण तयार करणार आहोत, केलंय, असं एलिझाबेथ खोटंच बोलल्या. तसं यंत्र ना तयार झालं होतं ना तयार होण्यासारखं होतं. रोगी आणि कंपनीत भांडवल गुंतवणारे यांना एलिझाबेथनी थापा मारल्या, फसवलं असा आरोप एलिझाबेथ होम्स यांच्यावर आहे. एलिझाबेथ होम्सनी २००३ साली वयाच्या अवघ्या १९व्या…