रविवारचा लेख. पेन्सिलवाला.
पेन्सिली जमवणारा माणूस अमेरिकेत आयोवा राज्यात कोलफॅक्स नावाचं एक गाव आहे. लोकसंख्या असेल दोनहजार बावीसशेच्या आसपास. येवढंसं ते गाव. त्यात एक कोलफॅक्स म्युझियम आहे. गिनेस बुक ऑफ रेकॉर्डची दोन माणसं गावातल्या म्युझियममधे पोचली. गावातले एक नागरीक एरन बार्थोल्मी (Aaron Bartholmey) यांनी जमवलेल्या पेन्सिली त्यांना पहायच्या होत्या, मोजायच्या होता. पेन्सिली साठवण्याचा उच्चांक बार्थोल्मी मोडताहेत का याची तपासणी त्यांना करायची होती. बार्थोल्मीनं घरात जमवलेल्या पेन्सिली ७५० खोक्यांत भरल्या आणि आपल्या कारच्या अनेक फेऱ्या करून म्युझियममधे नेऊन ठेवल्या. पेन्सिली मोजणीसाठी अख्खं…