पुस्तकवेड
BOOK MADNESS: STORY OF BOOK COLLECTORS IN AMERICA. DENISE GIGANTE. ।। पुस्तकं लोकांना वेड लावतात. नाना प्रकारे. कोणाला पुस्तकं वाचायला आवडतं. वाच वाच वाचतात. कामासाठी किवा हौस म्हणून. त्यांना पुस्तकातले किडे असं म्हणायची पद्दत आहे. कोणी भरपूर वाचतो पण काय वाचायचं याचा काही एक विचार ते करतात, ठरवून वाचतात. विषय, लेखक ही माणसं ठरवतात. कोणी माणसं वाचत फारसं नाहीत पण त्यांना पुस्तकं जमवायचा नाद असतो. आपल्याकडं पुस्तकं आहेत, इतकी आहेत, असली आहेत याचा त्यांना अभिमान असतो. ती माणसं भेटली की…