पुस्तक. साम्राज्यांचा उदयास्त

पुस्तक. साम्राज्यांचा उदयास्त

आधुनीक साम्राज्य हा प्रस्तुत पुस्तकाचा मुख्य विषय आहे. साम्राज्यं चालणं, टिकणं, लयाला जाणं यांचा अभ्यास ॲलसडेर रॉबर्ट्स (Alasdair Roberts) यांनी Superstates:  Empires of the 21st Century या पुस्तकात मांडला आहे. एकेकाळी पर्शियन, रोमन, मोर्य, मिंग, ऑटोमन इत्यादी साम्राज्यं होती. ती मोडली आणि देश निर्माण झाले. लेखकाचं म्हणणं आहे की सध्याचे देश (अमेरिका, भारत, चीन) आणि युरोपीय समुदाय ही सुद्धा साम्राज्यांचं रूप घेतील. लेखक त्यांना महाराज्यं, सूपरस्टेट असं म्हणतो. पूर्वीची साम्राज्यं आणि ही महाराज्यं यांची तुलना लेखक प्रस्तुत पुस्तकात लेखक करतो….

Read More Read More

रविवारचा लेख अफगाणिस्तान जगात किती नंबरचा श्रीमंत देश होणार?

रविवारचा लेख अफगाणिस्तान जगात किती नंबरचा श्रीमंत देश होणार?

अफगाणिस्तानातून नेहमी बाहेर येणाऱ्या बातम्या तालिबानच्या अत्याचारी, दहशतवादी, दंडेली वर्तणुकीच्या असतात.  स्त्रियांना घरात डांबलं जातंय; सदाचरण केलं नाही तर फटके मारले जातायत; विरोधकाना तुरुंगात डांबलं जातय; इत्यादी.  अशा अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणावर औद्योगीक खणती होऊ घातलीय, चीन अफगाणिस्तानात शिरतोय हे आपल्या कानावर फारसं पडत नाही. २००२ साली एक वू नावाचा माणूस नशीब काढायला काबूलमधे पोचला. त्यानं खटपट करून त्या काळातल्या अफगाण सरकारशी संधान बांधून यथावकाश एक पोलाद तयार करण्याचा कारखाना सुरु केला. अफगाणिस्तानमधला पहिला पोलाद कारखाना. भंगारातलं लोखंड वितळवून त्यातून पोलाद…

Read More Read More

सिनेमा ट्रंबो या पटकथालेखकाची गळेचेपी

सिनेमा ट्रंबो या पटकथालेखकाची गळेचेपी

 डाल्टन  ट्रंबो ही २०१५ सालची पोलिटिकल अमेरिकन फिल्म.   डाल्टन ट्रंबो (Trumbo) हा एक अमेरिकन पटकथालेखक होता. त्यानं ४० पटकथा लिहिल्या. काही ग्रेट होत्या. काही साधारण गल्लाभरू होत्या. कायम आनंदस्मरणात राहील अशी रोमन हॉलिडे ही फिल्म ट्रंबोनं लिहिली होती. दुसऱ्याच्या नावानं ती कथा लिहिली गेली आणि त्या दुसऱ्याच्याच नावानं तिला ऑस्कर मिळालं. कारण कम्युनिष्ट असल्याच्या आरोपावरून  सरकारनं त्याच्यावर चित्रपट लिहायला बंदी घातली होती. नंतर त्याच्या ब्रेव वन, स्पार्टाकस आणि एक्झोडस या पटकथांवरचे सिनेमे गाजले. ट्रंबोवर बहिष्कार असताना कर्क डग्लस या…

Read More Read More

 ओपनहायमरची क्षमा कधी मागणार?

 ओपनहायमरची क्षमा कधी मागणार?

  ओपनहायमर  चित्रपट जगभर सिनेमाघरात प्रदर्शीत झाला. लक्षावधी लोकांनी तो लगोलग पाहिला.  जे रॉबर्ट ओपनहायमर १९०४ साली न्यू यॉर्कमधे सधन घरात जन्मले, ते जन्मानं ज्यू होते. त्यांनी सुरवातीला केमेस्ट्री या विषयाचं  शिक्षण हार्वर्डमधे घेतलं. पण तो विषय त्यांचा नव्हताच. केंब्रीज आणि नंतर गॉटिंजनमधे त्यांनी क्वांटम मेकॅनिक्स या फीजिक्सच्या ज्ञानशाखेतलं शिक्षण घेतलं. १९३६ साली ते बर्कले युनिव्हर्सिटीत पदार्थविज्ञान शाखेचे प्रोफेसर झाले. पदार्थविज्ञानातले ऊच्च कोटीचे अभ्यासक आणि प्राध्यापक असा त्यांचा नावलौकिक होता. ओपन हायमर शाळेत गेले, कॉलेजात गेले,पीएचडी झाले, बर्कलेत प्राध्यापक झाले….

Read More Read More

पुस्तक. हिटलरपुढं शरणागतीचं अवघड फ्रेंच दुखणं

पुस्तक. हिटलरपुढं शरणागतीचं अवघड फ्रेंच दुखणं

देशांच्या, समाजांच्या काही खाचा अवघड असतात ज्यात पडायला देश तयार होत नाही. कारण त्या खाचेतल्या अंधारात खोलवर गेलं तर देशाचं लाज वाटावं असं वागणं प्रकाशमान होतं. ❖  २३ जुलै १९४५ ची दुपार. मरणाच्या उकाड्यात पॅरिसमधल्या हाय कोर्टात मार्शल पेतां यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुरु झाला. पेतां हे एकेकाळी फ्रान्सचे सरसेनानी होते, हीरो होते. सामान्यपणे  आरोपीला पिंजऱ्यात उभं केलं जातं. या खटल्यात मात्र मार्शल पेतां यांना बसण्यासाठी मखमली उशीनं मढवलेलं सिंहासनासारखं आसन देण्यात आलं होतं. त्यांच्यासमोर मखमली उशीनं मढवलेलं एक टेबल ठेवण्यात…

Read More Read More

रविवारचा लेख अमेरिकेचा इसरायलवर दबाव

रविवारचा लेख अमेरिकेचा इसरायलवर दबाव

पंतप्रधान नेतान्याहू यांच्या प्रस्तावित न्यायव्यवस्था सुधारणांना होणारा विरोध पुन्हा एकदा निदर्शनांच्या रुपात उफाळला आहे. ताजं कारण आहे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचं वक्तव्य. जो बायडन नुसतं म्हणाले की ते नेतान्याहू यांना भेटणार आहेत यावर तेल अवीवमधे हजारो लोक रस्त्यावर उतरले. बायडननी नेतान्याहू यांना भेटू नये, त्यांच्यावर कायदेसुधारणा मागे घेण्यासाठी दबाव आणावा असं लोकांचं म्हणणं आहे. न्यायमूर्ती, वकील, प्राध्यापक, लेखक, कलाकार,डॉक्टर्स इत्यादीं हजारोंनी पत्रक प्रसिद्ध करून बायडन भेट घेणार या बद्दल नापसंती व्यक्त केली. प्रकरण येवढ्यावरच थांबलेलं नाही. ३० हजार डॉक्टरनी…

Read More Read More

सिनेमा. एक माणूस इतिहास घडवतो!

सिनेमा. एक माणूस इतिहास घडवतो!

 चार्ली विल्सन्स वॉर. चार्ली विल्सन्स वॉर (२००७), नेटफ्लिक्स. रशियाची हेलेकॉप्टरं आणि गनशिप हवेत भिरभिरतात, रॉकेटं फेकतात. धुराचा लोट मागं सोडत अनघड अफगाण घरावर कोसळतात. धुराचे लोट. उध्वस्थ घर, सैरावैरा माणसं. अमेरिकेत चार्ली विल्सन हे काँग्रेसमन क्लबात, जाकुझीत, एका हातात ग्लास, दुसऱ्या हाती एक श्रीमंत महिला.जोआन हरिंग. हरिंग आणि चार्ली यांच्यातली सेक्समैत्री, पडद्यावर दिसते. श्रीमंत महिला सभा बोलावते.  सभेत झिया उल हक. श्रीमंत महिला हक यांचं कौतुक करते. झुल्फिकार अली भुत्तो यांना हकनी फाशी दिलेली असते हे साऱ्या जगाला माहित असतं….

Read More Read More

पुस्तक. खाजगी सैन्यांचा जमाना.

पुस्तक. खाजगी सैन्यांचा जमाना.

पुस्तकं.   खाजगी सैन्यांचा जमाना?  अफगाणिस्तान तिरीन कोट विभाग आहे. तिथं अफगाण सरकारचे कायदे कानून चालत  नाहीत. मतिउल्ला खान नावाच्या माणसाची सत्ता तिथं चालते. सरकारी योजना, सरकारी पैशाचं वाटप, नेमणुका इत्यादी गोष्टी मतीउल्ला खान हा माणूस करतो.  मतिउल्ला खानाची ही औकात आहे याचं कारण त्याच्याजवळ खाजगी सैन्य आहे. ते रीसतर सैन्य आहे आणि त्यातली भरती आणि कारभार सारं मतिउल्ला खान करतो. याच भागातून कंदाहारपर्यंत एक रस्ता जातो. या रस्त्यावरून अमेरिका आणि नेटोचं सैन्य जात असे, त्यांची रसद या रस्त्यावरून जात…

Read More Read More

वॅग्नर लेख ४. पुतीन सत्तेवरची पकड अधिक घट्ट करतील.

वॅग्नर लेख ४. पुतीन सत्तेवरची पकड अधिक घट्ट करतील.

प्रिगोझीननी वॅग्नर सेना मॉस्कोच्या दारात उभी केली. काही तासातच आपल्याला बंड करायचंच नव्हतं केवळ पुतीनना वस्तुस्थितीची जाणीव करुन द्यायची होती असं म्हणत पळ काढला. ही घटना साधीसुधी आहे काय? मामला आता संपलाय? या घटनेचा रशियन राजकीय स्थितीवर, पुतीन यांच्या सत्तेवर परिणाम होईल काय? प्रिगोझीनला खरोखरच काय साधायचं होतं ते कळायला मार्ग नाही. पण वॅग्नर सेना मॉस्कोकडं नेतांना त्यांनी काहीच तयारी केलेली नव्हती. सरकारला हादरवायचं असेल तर मुख्य लष्करातले लोक बरोबर घ्यायला हवेत, सरकारातले काही लोकं बरोबर घ्यायला हवेत. तसं काही…

Read More Read More

वॅग्नर लेख ३. कोण आहे हा प्रिगोझीन?

वॅग्नर लेख ३. कोण आहे हा प्रिगोझीन?

 प्रिगोझीनचा जन्म १९६१ सालचा. वयाच्या अठराव्या वर्षी त्याला चोरी करतांना लेनिनग्राड पोलिसानी पकडलं. दोन वर्षाची शिक्षा झाली. लहान वयाचे असल्यानं त्याला एका कारखान्यात काम करून शिक्षा भरून काढायची परवानगी कोर्टानं दिली,  तुरुंगवास टळला. या काळात प्रिगोझीन यांचं चोऱ्या करणं चालूच होतं. एका घरात घुसून टोळीनं वाईनचे ग्लासेस पळवले. त्यांची एक टोळी होती.  शिक्षेचा कालावधी संपल्यावर एकदा टोळी दरोडे घालायला निघाली. एका घरात घुसून त्यांनी २५० डॉलर लुटले, पळाले. नंतर ही लूट एंजॉय करायला ते रस्त्यावर हिंडत असताना एक सुंदर स्त्री…

Read More Read More