ट्रंप गमन. राष्ट्रपती बारमधे. त्रिभंग. १८० वर्षं जुनं पुस्तक दुकान.
फेरफटका ४ ।। डोनल्ड ट्रंप चोरट्यासारखे व्हाईट हाऊस सोडून गेले. जाण्यापूर्वी त्यानी निवडून आलेले जो बायडन यांची भेट घेतली नाही, त्यांना शुभचिंतन केलं नाही. व्हाईट हाऊस सोडायच्या आधी सामानाची बांधाबांध करत असताना ते गुन्हेगारांसाठी माफीपत्रं तयार करत होते. एकूण सुमारे १७५ लोकांना त्यांनी माफी दिली. बहुतेक सर्वांनी फ्रॉड, सार्वजनिक पैशाचा गैरवापर, कर चुकवणं,सत्तेचा गैरवापर करणं अशा स्वरूपाचे फौजदारी गुन्हे केले होते. एक उदाहरण लक्षात ठेवण्यासारखं आहे. स्टीव बॅनन या ट्रंप यांच्या सहकाऱ्यावर मेक्सको भिंत बांधणं या व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप…