नाटक आणि सिनेमा
नाटकाचा सिनेमा सरत्या २०२१ मधे जोएल कोएनचा दी ट्रॅजेडी ऑफ मॅक्बेथ न्यू यॉर्कच्या काही सिनेघरात प्रदर्शित झाला १६१० मधे मॅक्बेथचा प्रयोग (पहिला?) लंडनच्या ग्लोब नाटकघरात झाला होता. चारशे दहा वर्षाच्या काळात मॅक्बेथचे अगणित प्रयोग जगभरात झाले. अगणीत भाषांत मॅक्बेथची भांषांतरं आणि रुपांतरं झाली. सिनेमाचं सुरु झाल्यावर मॅक्बेथवर आणि मॅक्बेथच्या रुपांतरावर इंग्रजीत आणि जगभरच्या इतर भाषात शंभरपेक्षा जास्त सिनेमे झाले. नाटकातल्या आणि सिनेमातल्या लोकांना आयुष्यात कधी तरी शेक्सपियर करावा, कधी तरी मॅक्बेथ करावा असं वाटतंच. प्रत्येकाला ते एक आव्हान वाटतं. मॅक्बेथमधले संवाद आणि…