हिटलर माझा शेजारी…
गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माय नेबर ॲडॉल्फ हा चित्रपट दाखवण्यात आला. ॲडॉल्फ म्हणजे ॲडॉल्फ हिटलर…. काल परवापर्यंत एक बातमी मधेमधे येत असे. नेताजी सुभाषचंद्र बोस अजून जिवंत आहेत. अमूक ठिकाणी आश्रमात रहातात, तमूक ठिकाणी ते बाजारात दिसले. एकादा माणूस किंवा एकादी घटना जेव्हां गूढ असते, रहस्य झालेली असते तेव्हां अशा बातम्या उठत रहातात. त्यातूनच कॉन्स्पिरसी सिद्धांत, कारस्थान सिद्धांत जन्मतात. नेताजींचा मृत्यू झालेला नाही, ते योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर प्रकट होतील असं कारस्थान सिद्धांत सांगू लागतो. हिटलरच्या मृत्यूबाबतही असेच सिद्धांत नाझींनी…