इराण. आपल्याला दुःखात लोटणारं सरकार जनतेला नकोय.
इराणी नागरिकांच्या आंदोलनानं १६ नोव्हेंबर रोजी शिखर गाठलं. त्या दिवशी इराणभर, खेड्यात आणि शहरांत, १०० ठिकाणी माणसं रस्त्यावर उतरली. त्यात शेतकरी, कामगार, वकील, इंजिनियर, डॉक्टर, व्यापारी इत्यादी सर्व थरातली मंडळी होती. आंदोलकांची संख्या २ लाखांच्या आसपास होती. आंदोलन दडपण्यासाठी सरकारनं तीन दिवस इंटरनेट बंद केलं होतं. सरकारनं दिलेली माहिती अशी. नागरिकांनी ५० लष्करी आणि पोलिस ठाणी, १८३ पोलिसांच्या गाड्या, ७३१ बँका, ७० पेट्रोल पंप, ९ मशिदी आणि १०७६ बाईक्सवर हल्ले केले, जाळपोळ केली, तोडफोड केली, ३०७ खाजगी कार आणि ३४…