कोणीही जिंको वा हरो, फायदा भाजपचाच.
गोव्यातल्या ४० मतदार संघापैकी पणजी हा एक मतदार संघ. पणजी ही गोव्याची राजधानी असल्यानं आणि ते शहर जगप्रसिद्ध असल्यानं तिथली निवडणूक लक्षवेधक असणं स्वाभाविक आहे. पणजीत आता उत्पल पर्रीकर आणि बाबुश मॉंसेराट यांच्यात स्पर्धा आहे. उत्पल पर्रीकर अपक्ष आहेत, मॉंसेराट भाजपचे उमेदवार आहेत. शिव सेना, आप इत्यादी पक्ष उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देताहेत. उत्पल पर्रीकर भाजपचे सदस्य होते, तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेत आणि त्यांनी पक्ष सोडलाय. उत्पल पर्रीकरांची नाराजी तशी जुनीच आहे. एकदा २०१५ साली त्यांनी तिकीट मागितलं होतं. तेव्हां…