माओ झेडॉंगच्या भीषण कारकीर्दीचं चित्रण
World Turned Upside Down यांग जिशेंग यांच्या World Turned Upside Down या नव्या पुस्तकाची दखल पश्चिमी देशातली माध्यमं सध्या घेत आहेत. या पुस्तकात लेखकानं माओच्या १९६६ ते १९७६ च्या दरम्यान झालेल्या सांस्कृतीक क्रांतीवर सविस्तर लिहिलं आहे. माओच्या राजकीय जीवनातला पहिला टप्पा लाँग मार्चचा. खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांना संघटित करून माओनं चीनच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दीर्घ यात्रा काढली. या काळात माओनं पक्ष संघटित करून देशभर पसरला. परिणामी माओ चीनचा नेता झाला. दुसरा टप्पा होता चीनच्या झटपट आर्थिक विकासाचा. हनुमानासारखा सूर्य गिळायचा प्रयत्न माओनं केला. जगात कोणीही…