पाशवी शक्तीसमोर युक्रेन अजून टिकून आहे
काय होणार युक्रेनचं? आज रशियाची युक्रेनस्वारी १४ दिवस झालेत. युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. २४ फेब्रुवारीला रशियाच्या दबा धरून बसलेल्या फौजा युक्रेनमधे घुसल्या. नेमक्या किती ते सांगता येत नाही. कारण पुतीन हा एक नंबरचा फेकू माणूस आहे. खोट्या बातम्या पसरवणं, अपप्रचार करणं, कुभांड रचणं ही केजीबीत असताना अंगी बाणवलेली कला पुतीन वापरत आहेत. दीड लाख म्हणतात या दीड लाखात सुमारे ७० हजार आहेत राखीव जवान, म्हणजे सक्तीनं भरती केलेले तरूण. त्यांना युद्धाचा काहीही अनुभव नाही. काही आठवड्यांच्या जुजबी प्रशिक्षणानंतर त्यांना गणवेष घालून…