गोऱ्या तरूणानं १० काळ्यांना कां ठार केलं?
पेटन जेंड्रन. वय वर्षे १७. दोनशे मैलांचा प्रवास करून १३ मे रोजी बफेलो या गावात पोचला. टॉप्स या वाणसामानाच्या दुकानात जाऊन त्यानं रेकी केली. किती माणसं येतात, कसकशी येतात, गाड्या कुठं थांबवतात वगैरे. १४ मे रोजी दुपारी २.५ च्या सुमाराला तो टॉप्स दुकानाशी पोचला. त्यानं अंगावर लष्करी कपडे घातले होते आणि बुलेट प्रूफ जॅकेटही घातलं होतं. त्याच्याकडलं एक पिस्तूल आणि एक गन त्यानं गाडीतच ठेवली. बुशमास्टर ही सेमी ऑटोमॅटिक गन हातात घेतली. दुकानाच्या बाहेरच त्यानं गोळीबाराला सुरवात केली. दुकानात घुसून…