कायदा, सभ्यता, सदाचार न पाळणारा देशप्रमुख
कायदा, सभ्यता, सदाचार न पाळणारा देशप्रमुख. ।। ट्रंप यांनी युक्रेनच्या अध्यक्षांना फोन केला. त्यांना विनंती केली की जो बायडन यांचा मुलगा युक्रेनमधे सक्रीय असणाऱ्या एका कंपनीत संचालक होता हे प्रकरण उकरून काढा, त्याची माहिती मला द्या. त्या बाबत जुलियानी हे माझे वकील आणि अटर्नी जनरल बार तुमच्याशी संपर्क साधतील. ही विनंती करण्याच्या आधी अमेरिकेनं देऊ केलेली ४० कोटी डॉलरची मदत अमेरिकेनं रोखून ठेवली होती, ती पुन्हा सुरु केली. जो बायडन हे ट्रंप यांचे येत्या निवडणुकीतले संभाव्य प्रतिस्पर्धी आहेत, ओबामा यांच्या…