प्रेसिडेंटची न्यायाधिशाला लाच. दोघेही तुरुंगात.
फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सारकोझी यांना कोर्टानं पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. सारकोझी २००७ ते २०१२ फ्रान्सचे प्रेसिडेंट होते. त्यांच्या भानगडींची एक साखळीच आहे. निवडणुक प्रचार मोहीमेवर भरमसाठ पैसा खर्च केला. हा पैसा बेकायदेशीर पद्दतीनं गोळा केला. खर्चावरची कायद्यानं घातलेली मर्यादा ओलांडली. खटला सुरु झाल्यावर न्यायाधिशाला लाच दिली. पोलिस आणि न्यायाधीश देशद्रोहीच म्हणायचे. त्यांनी चक्क नीट चौकशी करून प्रेसिडेंट महोदयांना तुरुंगात धाडलं. सारकोझींची प्रचार मोहीम भारी देखणी. प्रचार सभांच्या वेळी झेंडे नाचवण्यासाठी माणसं गोळा केली. एका सभेत ६५ हजार, दुसऱ्या…