कॉनक्लेव, पोप निवडीची गोष्ट
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २६७ व्या पोपची निवड प्रक्रिया सुरू होती तेव्हां दोन चित्रपटांची आठवण झाली. २०१९ सालचा टू पोप्स आणि २०२४ सालचा कॉनक्लेव. दोन्ही चित्रपटांचा विषय पोपची निवड हाच होता. कॉनक्लेव या ताज्या चित्रपटाचा मुख्य किरदार कार्डिनल थॉमस लॉरेन्स आहे. चित्रपट सुरू होताना एक बिशप हातात एक ब्रीफकेस घेऊन जाताना पाठमोरा दिसतो. ब्रीफकेस अशी काही दिसते, बिशपची चाल अशी काही दिसते की त्या ब्रीफकेसमधे काही तरी महत्वाचं असणार. स्फोटक कागदपत्रं? बाँब असेल? कार्डिनल बाँब घेऊन कां फिरेल? हल्ली काही…