हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा.
हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा. ऑस्ट्रेलियात सिडनी शहरात समुद्र किनाऱ्यावर ज्यू माणसं हनुक्का सणाचा आनंद लुटत होते. दोन माणसांनी दुरवरून त्यांच्यावर बंदुक चालवली. ४० जणं जखमी झाले, १५ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर एका कारमधे आयईडी स्फोटकं सापडली. बाप आणि मुलगा अशी हल्लेखोरांची जोडी होती. बाप १९९८ मधे ऑस्ट्रेलियात स्थलांतरीत होऊन नागरीक झाला होता, २४ वर्षाचा त्याचा मुलगा ऑस्ट्रेलियात जन्मल्यानं जन्मजात नागरीक झाला होता. त्यांच्या घरी असलेल्या आणि त्यांनी वापरलेल्या म्हणून ६ बंदुका त्यांच्याकडं होत्या. या बंदुका लष्करी उपयोगासाठी…