गाढवं
अरे गाढव गाढव… जगातली गाढवांची संख्या घटतेय. गेल्या वर्षीपर्यंत जगात ५ कोटी गाढवं होती, आता त्यांची संख्या ४ कोटीवर आलीय. संख्या कमी होतेय आणि त्यांची मागणी वाढतेय. परिणामी गाढवांचा बाजार तेजीत आहे. हा बाजार अर्थातच चीनमुळं आहे. चीननं तयार केलेल्या ‘गाढव अर्थव्यवस्थेत’ गाढवांना मागणी आहे. चीनमधे गाढवांचा तुटवडा आहे, चीनला गाढवं हवी आहेत. चीनमधे १९९० साली १.१ कोटी गाढवं होती, २०२३ साली ती संख्या फक्त ११ लाखावर आलीय. काय झालं? चिनी गाढवांनी कुटुंब नियोजन केलं? शक्य आहे. गाढवं हा आपण…