भारत सरकारचं वर्तन योग्य नाही.
डेबी अब्राहम्स यांना भारत सरकारनं व्हिसा नाकारला. अब्राहम्स युकेच्या खासदार आहेत आणि युकेच्या संसदेनं नेमलेल्या काश्मिर प्रकरणाच्या कमीटीच्या अध्यक्ष आहेत. काश्मिरमधे जनतेचे लोकशाही अधिकार नाकारले जात आहेत, तिथल्या लोकांना नागरी स्वातंत्र्य नाकारलं जात आहे या मुद्द्यावर अब्राहम्स यानी वेळोवेळी निषेध आणि विरोध नोंदवला आहे. त्यांचं हे वर्तन देशविरोधी आहे असं ठरवून भारत सरकारनं त्याना प्रवेश नाकारला आहे. प्रत्येक देशाला परदेशी नागरिकाला देशात प्रवेश नाकारण्याचा अधिकार आहे. लोकशाहीच्या चौकटीत वावरणाऱ्या देशांनी हा अधिकार नाकारण्याच्या कसोट्या ठरवलेल्या असतात. देशाची सार्वभौमता टिकवणं ही…