या आंदोलनाचा अर्थ काय?
गेल्या आठवड्यात भारतभर विद्यार्थ्यांनी नागरीकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला. पोलिसांनी त्याना बडवून काढलं. वसतीगृह, ग्रंथालयात घुसूघुसू पोलिसांनी त्यांना बदडलं. पोलिसांसारखा वाटावा असा वेश करून हिंदुत्ववादी गुंडांचाही त्या कामी वापर करण्यात आला. हा नागडा उघडा फॅसिझम इतका असह्य होता की देशभर लाखो नागरीक रस्त्यावर आले, त्यांनी आंदोलन केलं. सुरवातीला हे आंदोलन विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखवण्यासाठी होतं, नंतर ते नागरीकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात परिवर्तीत झालं. अगदी सुरवातीपासून सुधारणांना झालेला विरोध नराजकीय होता. आसाम, मिझोरम, अरूणाचल, त्रिपुरा या ठिकाणचे नागरीक आंदोलनात उतरले होते कारण…