पुतीन पुन्हा निवडून आलेत
पुतीन अध्यक्ष होणारच होते, मतदान हा केवळ एक सोपस्कार होता. ६७ टक्के जनतेनं मतदान केलं त्यातल्या ७३ टक्के लोकांनी पुतीन यांना मतं दिली. इतर सात टिल्लूपिल्लू उमेदवार हरण्यासाठीच उभे होते. अलेक्सी नेवाल्नी हे त्यातल्या त्यात वजनदार प्रतिस्पर्धी होते. पुतीन यांनी त्यांच्यावर नाना खटले भरून निवडणुकीत उभं रहायला परवानगी नाकारली. नको असलेल्या प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढायचा ही तर पुतीन यांची शैलीच आहे. तीनच वर्षांपूर्वी क्रेमलीनच्या दारातच बोरिस नेमत्सोव यांचा खून झाला, भर दिवसा. कोणी केला? कां केला? काहीही कळलं नाही. येवढंच माहित…