Browsed by
Author: niludamle

दुर्गा, न्यूड, धर्म, सामान्य माणसं इत्यादी इत्यादी

दुर्गा, न्यूड, धर्म, सामान्य माणसं इत्यादी इत्यादी

khupach chaan uttar dilat ,hya ashya mansanni he desh tyanna surkshit vatat nasel tar desh sodun jave, vyakti swatantrya mhanje ekach dharmavar tika karne mhanje tumhi saral saral tyaa dharmacha anadar kartay, himmat asel tar itar dharma baddal hi kahi liha te nahi honar tumchyat , dr. baba saheb ambedkar he hindu kivva bramhan virodhi navhate. pan aaj kahi tumchya sarkhe mathe firu ahet je fakt hindu dharmchi cheshta karta , hya varun tumcha hindu dwesh disun yetoy . mag…

Read More Read More

दुर्गा, न्यूड. फिल्मस. समाजानं काय पहावं आणि काय पाहू नये असं ठरवण्याचा अधिकार सरकारला असावा काय?

दुर्गा, न्यूड. फिल्मस. समाजानं काय पहावं आणि काय पाहू नये असं ठरवण्याचा अधिकार सरकारला असावा काय?

” दुर्गा ” ही फिल्म गोव्यातल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवायला केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यानं नकार कां द्यावा? तसा नकार देण्याचा अधिकार त्या खात्याला असावा काय? फिल्ममधलं एक मुख्य पात्र दुर्गा आहे. दुर्गा आणि तिच्या सोबत असणारा कबीर  रात्री रेलवे स्टेशनकडं जाण्यासाठी एका व्हॅनमधे लिफ्ट घेतात. तिथून कथानक सुरू होतं. गाडीत असलेले पुरुष, नंतर मधे येणारे पोलीस पुरुष दुर्गाला कसं वागवतात याचं चित्रण चित्रपटात आहे. व्हॅनमधली माणसं दुर्गाकडं एक सेक्सवस्तू आहे अशा रीतीनं पहात होती. त्यावरून चित्रपटाचं शीर्षक सेक्सी…

Read More Read More

थोरो आणि गांधींची आठवण लोक कां काढतात?

थोरो आणि गांधींची आठवण लोक कां काढतात?

Henry David Thoreu, A life. Laura Walls.   हेन्री डेविड थोरो १८१७ ते १८६१ अशी ४४ वर्षं थोरो जगले. त्या काळात औद्योगीकरणानं जोर धरला होता आणि उद्योग शहरं उभारण्याच्या नादात जंगलं नाहिशी होई लागली होती. वर्णद्वेष आणि गुलामी हे अमेरिकन जीवनाला लागलेले रोग उफाळून आले होते, राज्यांतली आपसातली मारामारी सुरु झाली होती. एका मध्यम वर्गी कुटुंबात वाढलेल्या थोरो यांनी प्राप्त परिस्थिती नाकारून एक नवी वाट जगाला दाखवली.  निसर्गस्नेही जीवन, साधं जीवन, सार्वजनिक नैतिकता, सत्याग्रह, सविनय कायदे भंग या गोष्टी सांगितल्या,…

Read More Read More

स्पॅनिश फुटीरता- उपद्व्यापी पुढाऱ्यांची घातक खेळी

स्पॅनिश फुटीरता- उपद्व्यापी पुढाऱ्यांची घातक खेळी

कॅटेलोनिया या प्रांताला स्पेनमधून फुटायचं आहे. कॅटेलोनिया या राज्याच्या बार्सेलोना या राजधानीत एक जनमत घेण्यात आलं. त्यात ४३ टक्के लोकांनी भाग घेतला आणि त्यातल्या ९० टक्के लोकानी स्पेनमधून फुटायचा निर्णय घेतला. त्या नुसार बाहेर पडू इच्छिणाऱ्यांनी  कॅटोलोनियाच्या विधीमंडळात ठराव करून स्वतंत्र होण्याचा निर्णय जाहीर केला. स्पेन या देशाला कॅटेलोनियानं फुटणं मंजूर नाही. फुटण्याचा विचार आणि ठराव हा स्पेनच्या राज्यघटनेनुसार देशद्रोह आहे असं स्पेनच्या संसदेचं आणि अध्यक्षांचं म्हणणं आहे. स्पेनच्या अध्यक्षांनी कॅटेलोनियाच्या फुटीरवादी पुढाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावलाय. या आरोपाखाली त्या पुढाऱ्यांना…

Read More Read More

लविंग विन्सेंट. आनंद देणारा एनिमेशन पट

लविंग विन्सेंट. आनंद देणारा एनिमेशन पट

लविंग विन्सेंट या नावाची   व्हॅन गॉग या चित्रकारावरची एक फिल्म २०१७ च्या मामी उत्सवातलं एक मोठं आकर्षण ठरली.  व्हॅन गॉगनं त्याच्या  भावाला, थियोला, लिहिलेलं पत्रं घेऊन एक माणूस व्हॅन गॉगच्या गावात पोचतो. पत्रं पोचवत असतानाच तो व्हॅन गॉगच्या मृत्यू म्हणजे आत्महत्या होती की खून होता याचा शोध घेतो. या शोधावर ही ९० मिनिटांची फिल्म  Dorota Kobiela  या दिद्गर्शिकेनं तयार केलीय. फिल्म रोटोस्कोपिंग एनिमेशन हे तंत्र वापरून केलीय. रोटोस्कोपिंग या तंत्रात आधी फिल्म नेहमीच्या पद्धतीनं चित्रीत केली जाते. स्टुडियोत सेट लावून…

Read More Read More

माणसाचा देव करण्याचा खटाटोप

माणसाचा देव करण्याचा खटाटोप

देवासारखा माणूस तयार होईल काय? युवाल हरारी यांचं होमो डियस (Homo Deus) हे पुस्तक सध्या गाजतय. होमो डियस म्हणजे जवळ जवळ देव झालेला माणूस. देव म्हणजे पूर्ण व्यक्ती, पुर्ण निर्दोष व्यक्ती. एकेकाळी माकड असलेला माणूस विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून जवळजवळ देव बनवला जातोय या विषयाभोवती हे पुस्तक फिरतं. लेखक पृथ्वीचा  ४ अब्ज वर्षांचा जीवनप्रवास धुंडाळतो. आजचा माणूस घडण्याचा पहिला टप्पा ७० हजार वर्षांपूर्वी सुरु झाला. त्यावेळी  माणसाला बोधनाची, ज्ञान आणि समज घडवण्याची सोय मेंदूत झाली. ११ हजार वर्षांपूर्वी माणसानं…

Read More Read More

अँगेला मर्केल चवथ्यांदा चॅन्सेलर का झाल्या?

अँगेला मर्केल चवथ्यांदा चॅन्सेलर का झाल्या?

अँगेला मर्केल वैज्ञानिक आहेत. अनुभव घेणं, त्या अनुभवातून शक्यता लक्षात घेणं आणि त्या शक्यतांचा वापर करून पुढील निर्णय घेणं ही वैज्ञानिक कार्यपद्धती मर्केल यांच्या अंगी मुरली आहे. त्यामुळं अर्थव्यवस्था असो की राजकारण, मर्केल परिस्थितीचा अभ्यास करतात, शिकतात आणि त्यानंतर पुढली पावलं उचलतात.  अर्थव्यवस्था असो की राजकारण, मर्केल परिस्थितीचा अभ्यास करतात, शिकतात आणि त्यानंतर पुढली पावलं उचलतात. सभोवतालची परिस्थिती जशी असेल म्हणजे जसा अनुभव आला असेल त्यानुसार मर्केल धोरणं ठरवतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा भाग त्यांना सत्तेचा खेळ करताना उपकारक ठरतो. अँगेला…

Read More Read More

लास वेगाससारखी हत्याकांडं अमेरिकेतच कां घडतात?

लास वेगाससारखी हत्याकांडं अमेरिकेतच कां घडतात?

लास वेगासमधे स्टीवन पॅडॉकनं ५९ माणसांना ठार मारलं. ३२ व्या मजल्यावरच्या हॉटेल खोलीत, जिथून त्यानं गोळीबार केला, २३ बंदुका आणि हज्जारो गोळ्या होत्या. लास वेगासपासून चाळीस मैलावरच्या त्याच्या गावातल्या घरात पोलीस घुसले तेव्हां तिथं १९ बंदुका सापडल्या. ६४ वर्षीय पॅडॉकनं त्या गावातच असलेल्या गिटार आणि बंदुका या नावाच्या दुकानातून आणि काही अंतरावरच्या दुसऱ्या गावातून हस्तगत केल्या होत्या. पॅडॉक  गोरा होता, मुसलमान नव्हता, त्यानं जिहाद केला नव्हता. पॅडॉकवर कोणताही गुन्हा पूर्वी नोंदला गेलेला नव्हता. गोळीबाराची बातमी पसरल्या पसरल्या सोशल मिडियात दणादण…

Read More Read More

युस्कारा या भाषेची जगण्याची धडपड

युस्कारा या भाषेची जगण्याची धडपड

भाषेची जगण्याची धडपड. स्पेनमधे अनेक भाषा बोलल्या जातात. मुख्य भाषा स्पॅनिश. स्पॅनिशचीही अनेक रुपं बोलली जातात. युस्कारा ही भाषा स्पेनमधे आज सुमारे ७ लाख माणसं, म्हणजे स्पेनच्या लोकसंख्येच्या दोन टक्क्यापेक्षा कमी माणसं, बोलतात. नेमका आकडा कळायला मार्ग नाही. बास्क आणि नवारा  विभागातच ही भाषा बोलली जाते. ही भाषा स्पॅनिशपेक्षा इतकी वेगळी आहे की स्पॅनिश लोकांना त्यातलं हो की ठो कळत नाही. ही भाषा दडपण्याचा प्रयत्न कित्येक शतकं होतोय. गुप्तरीत्या घराच्या अंधाऱ्या माजघरांत ही भाषा आजांनी नातवांकडं सरकवली. स्पेनमधे बाहेरची माणसं…

Read More Read More

आतबट्ट्याचा, राजकीय, अविवेकी बुलेट ट्रेन प्रस्ताव

आतबट्ट्याचा, राजकीय, अविवेकी बुलेट ट्रेन प्रस्ताव

मुंबई ते अमदाबाद हे ५०८ किमीचं अंतर सरासरी ताशी ३२० किमी या वेगानं सुमारे अडीच तासात कापणारी बुलेट ट्रेन सुरु करण्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. जपान सरकार या ट्रेनसाठी ८८ हजार कोटी रुपयांचं कर्ज एक शतांश टक्का दरानं देणार आहे. भारत सरकार २२ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. म्हणजे हा प्रकल्प १.१ लाख  कोटी रुपयांचा असेल. २०१३ साली मनमोहन सिंग यांनी या प्रकल्पाची  शक्यता तपासणीचा करार जपान सरकारबरोबर केला होता. त्या वेळी नरेंद्र मोदींनी या करारावर टीका केली होती,…

Read More Read More